मानसिकदृष्ट्या बळकट
सध्या जगात कोरोना विषाणू थैमान घालून आहे. गेल्या काही दिवसांपासून मी देखील स्वतःला घरामध्ये बंद करून आहे. अश्या परिस्थितीमध्ये साहजिक आहे मनात नकारात्मक विचार येणे. बहुतांश वेळ माझा पुस्तके वाचण्यात जात आहे. असेच एक पुस्तक (13 Things Mentally Strong People Don't Do - Amy Morin) मला आवडले त्याबद्दल या ब्लॉग मध्ये लिहीत आहे. जेव्हा लेखिका एमी मॉरिन २३ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचा अचानक brain aneurysm मुळे मृत्यू झाला. तीन वर्षांनंतर तिचा नवरा (वय २६) याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एमीला असे वाटले की ती एखाद्या कठीण मानसिक चक्रात अडकलेली आहे. पण एक मनोचिकित्सक म्हणून तिने तिच्या कार्यावर लक्ष दिले आणि मानसिकदृष्ट्या बळकट लोक करीत नसलेल्या १३ गोष्टीं तिने मांडल्या. मानसिकदृष्ट्या बळकट लोकांना आरोग्यदायी सवयी असतात. ते त्यांच्या भावना, विचार आणि वागणूक अशा प्रकारे व्यवस्थापित करतात ज्याने त्यांना जीवनात यशस्वी होण्यास मदत केली जाईल. १. ते स्वत: साठी दिलगिरी व्यक्त करताना वेळ वाया घालवत नाहीत. मान...