असेल कुणीतरी...




डोळे पुसायला कुणीतरी असेल तरं,
रुसायला रं वाटतं,

ऐकणार कुणीतरी असेल तरं,
मनातल बोलायला बरं वाटतं,

कौतुक करणार कुणीतरी असेल तरं,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं,

नजर काढायला कुणीतरी असेल तरं,
नटायला बरं वाटतं,

हातात हात देणार कुणीतरी असेल तरं,
उन्हात चालायला बरं वाटतं,

आशेला लावणार कुणीतरी असेल तरं,
वाट बघायला बरं वाटतं,

जीव लावून प्रेम करणार कुणीतरी असेल  तरं,
प्रेमात पडायला बरं वाटतं,

आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तरं,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं,

डोळे भरून निरोप देणार कुणीतरी असेल तरं,
मरणही सुखाच वाटतं...




















Comments

Popular posts from this blog

Unfolding History: A Review of "Pakistan or The Partition of India" by Dr. B.R. Ambedkar

Artificial Intelligence Evolution

Challenge of the Automation