असेल कुणीतरी...
डोळे पुसायला कुणीतरी असेल तरं , रुसायला ब रं वाट तं , ऐकणार कुणीतरी असेल तरं , मनातल बोलायला बरं वाटतं , कौतुक करणार कुणीतरी असेल तरं , थकेपर्यंत राबायला बरं वाटतं , नजर काढायला कुणीतरी असेल तरं , नटायला बरं वाटतं , हातात हात देणार कुणीतरी असेल तरं , उन्हात चालायला बरं वाटतं , आशेला लावणार कुणीतरी असेल तरं , वाट बघायला बरं वाटतं , जीव लावून प्रेम करणार कुणीतरी असेल तरं , प्रेमात पडायला बरं वाटतं , आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तरं , मरेपर्यंत जगायला बरं वाटतं , डोळे भरून निरोप देणार कुणीतरी असेल तरं , मरणही सुखाच वाटतं ... ...